Suresh Kumar Jaithalia passes away :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देणारी दुःखद बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने जालना जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार पहाटेच्या सुमारास त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जालन्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असून त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Suresh Kumar Jaithalia passes away)
सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामे राबवली होती. मजबूत जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी जवळीक यामुळे ते मतदारसंघात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते.
Suresh Kumar Jaithalia passes away : अजित पवारांचा विश्वासू शिलेदार हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं निधन
त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. नंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जालना जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (Suresh Kumar Jaithalia passes away)
त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याने एक अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.