Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलबाबत इंडियन ऑईलने दिली महत्वाची माहिती; ‘विक्रीच्या बदलत्या पद्धतींमुळे….’
Petrol-Diesel : IOC ने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही भागांमध्ये मागणी आणि पुरवठ्यातील तात्पुरता असमतोल तसेच विक्रीच्या बदलत्या पद्धतींमुळे काही पेट्रोल पंपांवर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या.

Petrol-Diesel : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी वाढत असतानाच काही पेट्रोल पंपांवर इंधन मिळत नसल्याच्या आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) देशात इंधनाचा कोणताही एकूण तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती ही स्थानिक आणि तात्पुरती असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
…म्हणून अडचणी निर्माण झाल्या – (Petrol -Diesel)
IOC ने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही भागांमध्ये मागणी आणि पुरवठ्यातील तात्पुरता असमतोल तसेच विक्रीच्या बदलत्या पद्धतींमुळे काही पेट्रोल पंपांवर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, कंपनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून ग्राहकांना अखंडित इंधनपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
Behind every smooth drive is the dedication of our workforce, ensuring fuel is available whenever and wherever you need it.#IndianOil #StayCalmIndia #FuelAvailablity #OnDutyAlways@HardeepSPuri @PetroleumMin @neerajmittalias @sahneyas @ChairmanIOCL pic.twitter.com/LwMSTafv1I
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) May 23, 2026
कंपनीने म्हटले आहे की, देशभरातील ४२ हजारांहून अधिक पेट्रोल पंपांच्या नेटवर्कपैकी अत्यल्प पंपांवरच पुरवठा विस्कळीत झाला आहे. बहुतांश ठिकाणी इंधनसाठा आणि पुरवठा सुरळीत व पुरेसा आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांकडे देशभरात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचेही IOC ने स्पष्ट केले. (Petrol-Diesel)
मागणीत वाढ होण्यामागे हंगामी कारणे – (Petrol-Diesel)
IndianOil retail outlet are operating absolutely normal. Fuel availability is normal and Supplies are steady, with no concerns or disruptions. Feedback from one of our regular customer from Haryana.#StayCalmIndia #EnergyofIndia #AlwaysOnDuty #IndianOil #DoNotPanic #NationFirst… pic.twitter.com/KyU0oXn3Zc
— IOCL_Delhi State Office (@DelhiIocl) May 23, 2026
दरम्यान, काही पेट्रोल पंपांवर मागणीत वाढ होण्यामागे हंगामी कारणे असल्याचे कंपनीने सांगितले. पीक कापणीच्या काळात डिझेलची मागणी वाढली आहे. तसेच खासगी पेट्रोल पंपांवरील इंधनाचे दर तुलनेने जास्त असल्याने ग्राहक सरकारी पंपांकडे वळत आहेत. संस्थात्मक खरेदीत वाढ झाल्याचाही परिणाम मागणीवर झाल्याचे कंपनीने नमूद केले.
किंमतीत पुन्हा वाढ – (Petrol-Diesel)
Petrol, Diesel price hiked: RSPs of four Metros for 23.05.26 are as under:
Petrol
Delhi 99.51 (+0.87)
Kolkata 110.64 (+0.94)
Mumbai 108.49 (+0.90)
Chennai 105.31 (+0.82)Diesel
Delhi 92.49 (+0.91)
Kolkata 97.02 (+0.95)
Mumbai 95.02 (+0.94)… pic.twitter.com/5bEQ2dOSDk— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2026
याचदरम्यान शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ करण्यात आली. गेल्या नऊ दिवसांतील ही तिसरी दरवाढ असून या कालावधीत इंधन दरांत एकूण पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८७ पैसे, तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ केली आहे. (Petrol-Diesel)
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत असल्याचे सांगितले जात आहे.




