Kerosene Oil : केंद्राची केरोसीन वाटपास मंजुरी.! शिधापत्रिका धारक कुटुंबास मिळणार ३ लिटर केरोसीन
पहिल्या पंधरवड्यात एकूण वाटपाच्या 85 टक्के केरोसीन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Kerosene Oil – आखाती देशातील संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिक गॅसटंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपास राज्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना एका शिधापत्रिकेमागे 3 लिटर केरोसीन मिळणार आहे.Kerosene Oil
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तात्पुरत्या स्वरुपात केरोसीन वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हानिहाय आवश्यक केरोसीन वितरण निश्चित केले असून मार्च-एप्रिलमध्ये राज्यात तिन्ही सरकारी तेल कंपन्यांकडून केरोसीन वाटप होणार आहे. Kerosene Oil
पहिल्या पंधरवड्यात एकूण वाटपाच्या 85 टक्के केरोसीन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबास 3 लिटर तर, ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसीन वितरणास पात्र राहणार आहेत. तसेच, श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसीन मिळण्यास पात्र असतील, अशी माहिती आहे.






