Ration Card New Rule : राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांना बसणार फटका; ‘या’ तारखेपासून होणार नवे नियम लागू, लाभ होणार बंद
Ration Card New Rule : केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डसाठी नवीन आणि कडक निकष लागू करण्यात आले आहेत.

Ration Card New Rule : केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या संकल्पनेला अधिक प्रभावी करण्यासाठी १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डच्या नियमांत मोठे बदल करण्यात येणार आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डसाठी नवीन आणि कडक निकष लागू करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मोफत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी उत्पन्नाची आणि मालमत्तेची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार रेशन कार्डधारकांची काटेकोर छाननी होणार आहे. यामुळे देशभरातील लाखो रेशनकार्डधारक अपात्र होण्याची शक्यता आहे.
गरजूंपर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्य सक्षम असणाऱ्यांची नावे यादीतून रद्द करण्यात येणार आहे. Ration Card New Rule
काय आहेत नियम? Ration Card New Rule
- उत्पन्न मर्यादा: शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते कुटुंब अपात्र ठरेल.
- चारचाकी वाहन: ज्या कुटुंबाच्या मालकीची चारचाकी गाडी (कार, ट्रॅक्टर इ.) आहे, त्यांना आता रेशनचा लाभ घेता येणार नाही.
- मालमत्ता: तुमच्याकडे १०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचे पक्के घर असेल, तसेच घरात एसी, जनरेटर असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात.
- इन्कम टॅक्स: कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर (Income Tax) भरत असेल, तर त्या संपूर्ण कुटुंबाचे रेशन कार्ड बंद केले जाईल.
याशिवाय सर्व रेशन कार्डधारकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन KYC पूर्ण केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड बंद केले जाईल.
प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा
जर तपासादरम्यान एखादी व्यक्ती चुकीची माहिती देऊन रेशन घेत असल्याचे आढळले, तर त्याचे रेशन कार्ड रद्द होईल. इतकेच काय तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.
सध्याच्या आकडेवारीनुसार, या नवीन छाननीमुळे देशभरातील सुमारे ७० लाख अपात्र रेशन कार्ड्स बंद होण्याची शक्यता आहे. Ration Card New Rule
हेही वाचा:






