Sonali Kulkarni : ‘पडद्याचं जॅकेट’; अनोख्या फॅशनमुळे सोनाली कुलकर्णी ट्रोल
Sonali Kulkarni : काहींनी सोनाली कुलकर्णीच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल केले आहे.

Sonali Kulkarni : मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णीने अनेक आव्हानात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. सोशल मिडियावर देखील सोनाली सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni )नवीन फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी सोनालीने फिकट पिवळ्या रंगाचा कॉर्सेट टॉप, हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंट पॅण्ट आणि प्लेन जॅकेट परिधान केले आहे. Sonali Kulkarni
Instagram पर यह पोस्ट देखें
तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. तर काहींनी तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोनालीचे जॅकेट पाहून नेटकऱ्यांनी ‘पडद्याचं जॅकेट’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीला खरी ओळख नटरंग चित्रपटातील भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिने नटरंग चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले.
यामध्ये ‘मितवा’, ‘हंपी’, ‘व्हिक्टोरिया एक रहस्य’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘गाढवाचं लग्न’, ‘पोश्टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो. लवकरच ती तीन भिंतींच्या घराची गोष्ट ‘तिघी’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२६ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
Dhurandhar The Revenge : रणवीर सिंगचा खतरनाक लुक; पहिलं पोस्टर रिलीज





