Pune News : पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे यांचे निधन
खडक पोलिस ठाण्यातील (Pune News) उपनिरीक्षक राहुल देवराम मखरे (वय ५५) यांचे १० नोव्हेंबर रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर कात्रज येथील स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Updated On:

Pune News : खडक पोलिस ठाण्यातील (Pune News) उपनिरीक्षक राहुल देवराम मखरे (वय ५५) यांचे १० नोव्हेंबर रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर कात्रज येथील स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मखरे यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि भाउ असा परिवार आहे. पोलिस शिपाई म्हणून शहर पोलिस दलात भरती झालेल्या मखरे यांनी शहरातील विविध पोलिस ठाण्यांसोबतच वाहतूक आणि क्राईम ब्रांचमध्ये सेवा बजावली आहे. नागरिकांशी आणि सहकार्यांशी नेहमीच सौदार्हाने वर्तणूक असलेले पोलिस अधिकारी (Pune News) म्हणून ते संपुर्ण शहरात परिचित होते.
पाडव्या निमित्त सहकुटुंब वेल्हे येथील गावी गेले असताना छातीत जळजळ करू लागल्याने ते नजीकच्या खाजगी रुग्णालयात गेले होते. परंतू उपचार सुरू असतानाच त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती (Pune News) त्यांच्या कुटुंबियांनी दिली.






