Pune News : ४० हून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोंटींची फसवणूक; न्यायालयाने फेटाळला जामीन
Pune News : गुंतवणूकीवर दरमहा ५ टक्के आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून ४४ हून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्याला न्यायालयाने दणका दिला आहे.

Pune News : गुंतवणूकीवर दरमहा ५ टक्के आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून ४४ हून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्याला न्यायालयाने दणका दिला आहे. उपलब्ध पुराव्यांवरून गुन्ह्याचे स्वरूप व गांभीर्य लक्षात घेता, या टप्प्यावर आरोपीला मुक्त करण्यासाठी कोणतेही समर्थनीय कारण दिसून येत नाही, असा निष्कर्ष काढत अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी.क्षीरसागर यांनी जामिनाचा अर्ज फेटाळला. (Pune News)
अरविंद राजेंद्र रजपूत असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. त्याच्या जामिनास सरकारी वकील व फियादींचे वकील कमलेश गावडे यांनी विरोध केला. गावडे यांना अनिकेत सुर्यवंशी आणि शुभम कर्डिले यांनी सहाकर्य केले. २०२२ ते २०२६ या कालवधीत ही घटना घडली आहे. (Pune News)
याबाबत जूनमध्ये खडक पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूकीतून आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. यामध्ये रजपूत अटकेत असून, त्याने केलेला जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. (Pune News)





