Nasrapur Case : शिवसेनेच्या महिलांनी पुण्याच्या सहपोलीस आयुक्तांची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी
जिल्ह्यातील नसरापूर गावात (Nasrapur Case) चिमुरड्या मुलीवर झालेल्या अत्यारासह खूनाच्य घटनेने गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nasrapur Case : जिल्ह्यातील नसरापूर गावात (Nasrapur Case) चिमुरड्या मुलीवर झालेल्या अत्यारासह खूनाच्य घटनेने गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यापार्श्वभूमीवर महिलांची सुरक्षितता वाढावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिलांनी (Nasrapur Case) पुणे पोलीस आयुक्तालयात सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेतली. यावेळी कीर्ती फाटक यांच्यासह इतर महिला, शहरप्रमुख वसंत मोरे उपस्थित होते.
कीर्ती फाटक म्हणाल्या, महिलांना सुरक्षित वाटत नाही, कायद्याचे भय राहिले नाही, हे थांबायला पाहिजे. आम्हाला सुरक्षितपणे वावरायचे असून, याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट (Nasrapur Case) घेतली.
त्यांनी महिलांसाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांसह उपक्रमाची माहिती घेली. पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक, डायल ११२ क्रमांक यासह स्थानिक पोलीस ठाण्यातील महिला कार्यरत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, रस्त्यावरील सुरक्षा पथके वाढली पाहिजे. महिला पोलीस कर्मचारी वाढल्या पाहिजेत, अशी मागणी महिलांनी केली. तसेच राज्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे, हे मान्य करावे लागत आहे. किती मोर्चे काढायचे तरी काहीही होत नाही. गृहमंत्र्यांनी कानावर, डोळ्यावर हात ठेवले तर काहीही होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.






