Gadhi Book Publications : किल्ल्यांप्रमाणे गढ्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या साक्षीदार; छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केले मत
किल्ल्यांप्रमाणे गढ्या (Gadhi Book Publications) याही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत, त्यांचे जतन, संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करूच परंतु, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Gadhi Book Publications : किल्ल्यांप्रमाणे गढ्या (Gadhi Book Publications) याही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत, त्यांचे जतन, संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करूच परंतु, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यातून इतिहासाची साक्ष देणारा हा ठेवा जपला जाईल, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभवांवर आधारित लेखक प्रवीण हरपळे लिखीत गढी या पुस्तकाचे प्रकाशन (Gadhi Book Publications) तसेच महाराष्ट्रातील गढ्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजेराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आपण आपल्या इतिहासाच्या खुणा जपल्या पाहिजेत याच्या जबाबदारीची जाणीव या गढी पुस्तकातून झाली. हे वैभव जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र पुढे आले पाहिजे. याकामाची सुरूवात करावी लागेल. याकरीता त्यांनी व्यासपीठावर उपस्थित शासकीय अधिकारी यांना सूचना केल्या तसेच सामाजिक, गिर्यारोहण संघटनांनाही आवाहन केले.
यावेळी आमदार चेतन तुपे यांनी आपल्या मनोगतात अभ्यासपूर्ण बाबी मांडताना गढी या पुस्तकाचे कौतुक केले. गढ्यांच्या संवर्धनाबाबत विधानसभेत मुद्दा मांडणार असल्याचे आश्वासन देत त्यांनी किल्ल्यांचे प्रकार यासह गढ्या आणि वाडे यांच्या संरचनेतील काही साधर्म्य (Gadhi Book Publications) याविषयही सविस्तर मुद्दे मांडले. राजस्थान, गुजरात येथील किल्ले आणि गढ्या आजही सुस्थितीत आहेत.
परंतु, आपल्या महाराष्ट्रातील चित्र मात्र वेगळे असल्याची खंत व्यक्त करीत मराठ्यांनी मुघलांचे आक्रमण थोपविल्याने दक्षिणेकडील मंदीर आजही सुस्थितीत असल्याचे आमदार तुपे यांनी ठामपणे सांगितले. यावेळी इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे, आमदार राहुल कुल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. लेखक प्रवीण हरपळे, प्रकाशक दामोदर मगदूम नाईक यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास मनोगतातून उलगडला.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साहित्यिक अमर जाधवराव, अरुण बोर्हाडे, नगरसेवक मारुतीआबा तुपे, नगरसेवक निवृत्तीअण्णा बांदल, नगरसेवक महेश हरपळे, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक नानासाहेब झांबरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे, एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर, लेखक प्रवीण हरपळे, प्रकाशक दामोदर मगदूम नाईक आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर श्रीहरी तापकीर यांनी आभार मानले.
आमच्या परिसरातील युवा लेखक प्रविण हरपळे यांनी अतिशय वेगळा विषय घेऊन त्याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांपुढे मांडली आहे. गढ्यांचे महत्त्व किती आहे, हे त्यांच्या पुस्तकातून तसेच त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून सहज लक्षात येते.
– मारूतीआबा तुपे, नगरसेवककिल्ल्यांप्रमाणेच गढ्यांनाही ऐतिहासीक महत्त्व आहे, आजही आपण ग्रामीण भागात अशा गढ्या पाहतो, त्याचे जतन करायला हवे, शहरातलगत अशा काही गढ्या आहेत, त्या संवर्धनाबाबत महापालिकेत मुद्दा मांडणार आहे.
– निवृत्तअण्णा बांदल, नगरसेवक






