Rohit Pawar : विकासकामांची पोलखोल! तळेगावमध्ये रस्ता फुटून उसळला पाण्याचा फवारा; रोहित पवार म्हणाले…
Rohit Pawar : पाईपलाईनच्या कामातील गंभीर हलगर्जीपणा समोर

Rohit Pawar : पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये चक्क रस्ताचं फुटला असल्याची घटना घडली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरू होताच पाईपलाईनमधील त्रुटी उघड झाली. नगरपरिषदेकडून शनिवारी पाईपलाईनची चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतून पाणी सोडण्यात आलं.
मात्र अचानक रस्त्याच्या मधूनचं पाण्याचा मोठा फवारा उसळला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार यांनी ‘हे आहे, महाराष्ट्रातील ‘विकासाचं मॉडेल’, असे म्हणत प्रशासनावर टीका केली आहे.
‘पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन ‘विकास’ जन्माला आला…. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता-धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला…’ असे ट्वीट करत रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन ‘विकास’ जन्माला आला…. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला…
हे आहे, महाराष्ट्रातील ‘विकासाचं मॉडेल’. pic.twitter.com/qs83s9NNwp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 5, 2026
नेमकं काय घडलं?
तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दीड वर्षांपूर्वी रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले.
पुढील आठवड्यात या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्याचे ठरलं. पण तत्पूर्वी नगरपरिषदेकडून शनिवारी पाईपलाईनची चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतून पाणी सोडण्यात आलं. पण चक्क रस्ता फुटून त्यातून पाणी वाहू लागलं.
याद्वारे रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातील गंभीर हलगर्जीपणा समोर आला. हा सगळा पराक्रम कंत्राटदारांनी केला आहे. तपासणी दरम्यान पाईपलाईन जोडणी करताना, कंत्राटदार महाशयांनी दोन पाईप एकमेकांना जोडल्याचं नसल्याचे समोर आलं.सुदैवाने ही घटना चाचणीदरम्यान घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
परंतु लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चाचणी करताच घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
हेही वाचा:





