26/11 Attacks : २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना
26/11 Attacks :

पोलिसांकडून मानवंदना ; ३१५० विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली अर्पण
26/11 Attacks : मुंबईमधील २६/११ हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्याचे स्मरण सारसबागेत मानवंदना देऊन करण्यात आले.
पुणे शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आणि बँड पथकाने दिलेली मानवंदना आणि तीन हजार १५० शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फ मुंबईमध्ये २६ / ११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्मिता वस्ते, लता गौडा, राजेंद्र काकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
पोलीस दलातील पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, संजय पाटील, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, सागर कवडे, चिलुमुला रजनीकांत, राजलक्ष्मी शिवणकर, अभिनाश कुमार, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ, पी. आर. पाटील आणि संदीप भाजीभाकरे यांसह पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे पीपल्स बँकेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, वसुली अधिकारी संजय राजपूत व सेवक हे उपस्थित होते. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष राजाभाऊ महाडिक, तन्मय तोडमल, उमेश कांबळे, सचिन ससाणे, अमर लांडे, विक्रांत मोहिते,पराग शिंदे, नमन कांबळे, मित नानावटी यांनी उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांनी केले.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, डॉ. गिरीष चरवड, नितीन होले, संदीप गायकवाड, प्रा. शिवानी पाटील, प्रा. दीपक बोरसे, प्रा. योगेश भास्करे, प्रा. किशोर जाधव, प्रा. प्रणय कुंवर, प्रा. चारुता खारोकर आणि शेखर देडगावकर यांनी काम पाहिले.





