Pune Gramin : छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमातील ‘त्या’ वक्तव्यावरून वाद; एकबोटेंवर कठोर कारवाईची मागणी
शंभू वंश प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात (Pune Gramin) एकबोटे यांनी केलेले वक्तव्य समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असून सामाजिक सलोखा बिघडविणारे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Pune Gramin : नारायणगाव (Pune Gramin) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम समाजाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह व असंविधानिक वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नारायणगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शंभू वंश प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात (Pune Gramin) एकबोटे यांनी केलेले वक्तव्य समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असून सामाजिक सलोखा बिघडविणारे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कार्यक्रमादरम्यान “जे हिंदू तरुण मुस्लिम मुलींना पळवून आणून विवाह करतील त्यांना एक लाख रुपये व चांदीचे कडे बक्षीस दिले जाईल,” असे वक्तव्य करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
नारायणगाव हे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्य जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. विविध समाजातील नागरिक अनेक वर्षांपासून एकोप्याने राहत असून सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याची परंपरा येथे कायम असल्याचे नागरिकांनी नमूद केले. मात्र काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा बसावा यासाठी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.






