Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू
Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात अंगरक्षक म्हणून कार्यरत पोलीस उपनिरीक्षक विजय शंकर सांगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Police Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय शंकर सांगडे (५७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
विजय सांगडे हे कल्याण नियंत्रण कक्षात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात अंगरक्षक म्हणून करण्यात आली होती.
कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात असताना सांगडे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सांगडे हे मूळचे जुन्नर येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. सांगडे यांच्यावर जुन्नर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.





