अर्थसंकल्पात सातारा-जावळी मतदारसंघासाठी भरघोस निधी

सातारा – सातारा-जावळी मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांच्या डांबरीकरण, रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी तब्बल 90 कोटी रुपये निधी नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जावळी तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग पाचगणी-कुडाळ रस्ता भाग पाचगणी ते काटवली घाट खचलेल्या रस्त्याची सुधारणा, संरक्षक भिंत (दोन कोटी), मेढा (वेण्णा चौक)-कुसुंबी-सह्याद्रीनगर-कोळघर फाटा-अंधारी-मुनावळे-वाघळी-शेंबडी-बामणोली रस्ता भाग मेढा-मोहोट फाटा रुंदीकरण (दोन कोटी), सांगवी फाटा-कुसुंबी रस्ता रुंदीकरण (तीन कोटी), मेढा-कुसुंबी-कोळघर रस्ता (साडेतीन कोटी), राज्य मार्ग 140 ते आंबेघर फाटा-पुनवडी-केडंबे-बोंडारवाडी रस्ता भाग बाहुले-बोंडारवाडी रस्ता (एक कोटी 80 लाख), पाचगणी-कुडाळ रस्ता भाग करहर-हुमगाव रस्ता (दोन कोटी 85 लाख), जोर-वाई-पाचवड-मेढा रस्ता भाग आलेवाडी घाट संरक्षक भिंत व क्रॅश बॅरिअर (एक कोटी 20 लाख), आनेवाडी-सायगाव-मोरघर-वाघेश्वर रस्ता भाग मोरघर-वाघेश्वर रस्ता सुधारणा (दोन कोटी 35 लाख), राज्य मार्ग 4 ते पाचवड-कुडाळ-मेढा-कोळघर-अंधारी-फळणी-मुनावळे-वाघळी -शेंबडी रस्ता भाग पाचवड-मेढा आणि भाग मेढा-शेंबडी रस्ता (71 लाख), वालुथ-करहर रस्ता (एक कोटी), सायगाव-महिगाव रस्ता (30 लाख), प्रजिमा 26 ते एकीव-सह्याद्रीनगर रस्ता (एक कोटी 40 लाख), सायघर-कावडी व कावडी-हातगेघर रस्ता (एक कोटी), राज्य मार्ग 140 ते नांदगणे-पुनवडी रस्त्यावरील पूल (एक कोटी), काटवली ते रोहाट वस्ती रस्ता (50 लाख), केळघर ते कुरळोशी रस्ता (90 लाख), प्रजिमा 19 ते नेवेकरवाडी रस्ता सुधारणा (30 लाख), एकीव-दुंद-मालचौंडी रस्ता (70 लाख), म्हाते-भामघर रस्ता (70 लाख), सातारा तालुक्यातील शेंद्रे-सातारा बाह्यवळण रस्ता भाग शेंद्रे-सोनगाव फाटा (साडेपाच कोटी),
लिंब खिंड-खिंडवाडी रस्ता भाग लिंब खिंड-रामनगर रस्ता (अडीच कोटी), आसनगाव, कुसवडे, निनाम, सोनापूर, गणेशखिंड ते कोंजावडे रस्ता भाग कुमठे फाटा- निनाम रस्ता (दोन कोटी), प्रजिमा 29 परळी फाटा-बनघर रस्ता (अडीच कोटी), दहिवड-लुमणेखोल रस्ता (अडीच कोटी), जळकेवाडी- धावली रस्त्याची सुधारणा (अडीच कोटी), महामार्ग 4 ते शेंद्रे, वेचले, डोळेगाव, भाटमरळी, कुसवडे, नरेवाडी रस्ता भाग भाटमरळी-कुसवडे रस्ता (अडीच कोटी), महामार्ग 4 ते शेंद्रे, वेचले, डोळेगाव, भाटमरळी, कुसवडे, नरेवाडी रस्ता शेंद्रे ते वेचले दरम्यान मोठ्या पुलाच्या आणि डोळेगाव येथील लहान पुलाच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन आणि सुधारणा (दोन कोटी), दरे-रेवंडे घाट सुधारणा (अडीच कोटी), अंबवडे-चिकणेवाडी रस्ता रुंदीकरण व सुधारणा (अडीच कोटी), भोंदवडे- काळोशी फाटा रस्त्याची सुधारणा (एक कोटी 80 लाख), लिंब शेरी रस्ता (40 लाख), लिंब-आवळी माथा रस्ता (एक कोटी), कुशी-नागेवाडी रस्ता (20 लाख), हिरापूर जोडरस्ता (40 लाख), शाहूपुरी-अंबेदरे रस्ता (60 लाख), आवाडवाडी जोडरस्ता (80 लाख), दरे बुद्रुक-कोंडवे रस्ता (25 लाख), आटाळी-पारंबे रस्ता (50 लाख), अंबानी जोडरस्ता (30 लाख),
सांबरवाडी रस्ता (30 लाख), यवतेश्वर जोडरस्ता (60 लाख), काळोशी-आंबवडे रस्त्याची सुधारणा (70 लाख), चिकणेवाडी, मनवेवाडी, सावंतवाडी, शिंदेघर रस्ता भाग मनवेवाडी, सावंतवाडी, शिंदेघर रस्ता सुधारणा (80 लाख), चिकणेवाडी रस्ता (एक कोटी), तांबी-भांबवली रस्ता सुधारणा (90 लाख), सज्जनगड जोडरस्ता सुधारणा (70 लाख), साठेवाडी जोडरस्ता सुधारणा (25 लाख), जकातवाडी-शहापूर रस्ता सुधारणा (60 लाख), वेचले-शिवाजीनगर-करंडी रस्ता सुधारणा (50 लाख), शेरेवाडी जोडरस्ता सुधारणा (30 लाख), आसनगाव-परमाळे रस्ता सुधारणा (एक कोटी 40 लाख), बेंडवाडी, परमाळे, पिलाणीवाडी, नरेवाडी, कौंदणी, पिरेवाडी रस्ता (एक कोटी 20 लाख), उपळी-शेळकेवाडी रस्ता (50 लाख), वेचले-शेळकेवाडी रस्ता सुधारणा (50 लाख), बोरगाव जोडरस्ता सुधारणा (20 लाख), भरतगाववाडी-भरतगाव रस्ता सुधारणा (50 लाख), घाटवन जोडरस्ता सुधारणा (30 लाख),
बोंडारवाडी रस्ता (40 लाख), बोरगाव शेती शाळा रस्ता सुधारणा (60 लाख), ताकवली जोडरस्ता सुधारणा (50 लाख), सातारा, गजवडी, ठोसेघर, चाळकेवाडी, पाटण रस्ता भाग बोगदा ते सातारा तालुका हद्द सुधारणा सविस्तर प्रकल्प तयार करण्यासाठी (33 लाख 13 हजार) असा निधी मंजूर करण्यात आला आहे.





