Mallikarjun Kharge : खर्गेंना नोटीस म्हणजे राज्यघटनेवर घाला; काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका
कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना नोटीस बजावण्यात आल्यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले. ती घडामोड म्हणजे राज्यघटनेवर घाला असल्याचे पक्षाने म्हटले.

Mallikarjun Kharge : कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना नोटीस बजावण्यात आल्यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले. ती घडामोड म्हणजे राज्यघटनेवर घाला असल्याचे पक्षाने म्हटले.
खर्गे यांनी चेन्नईतील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यावेळी त्यांनी दहशतवादी या शब्दाचा वापर केला. त्यावरून निवडणूक आयोगाने नोटीस बजावून खर्गे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले. त्यावर कॉंग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यांनुसार आयोग नाचत असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. लाखों मतांच्या चोरीची कारस्थाने रचण्यात आली.
विशेषत: पश्चिम बंगालमध्ये ते दिसून आले. आयोग गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील कार्यालय बनून कार्य करत आहे. त्याविषयीचा ताजा पुरावा आता मिळाला. निवडणूक आयोग एक घटनात्मक संस्था आहे.
मात्र, आयोगाचे वर्तन राज्यघटनेवरच हल्ला करणारे आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सर्वांधिक जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले. त्यातून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पुन्हा घेरले. कॉंग्रेससह विरोधकांकडून सातत्याने निवडणूक आयोग आणि कुमार यांच्यावर निशाणा साधण्याचे सत्र चालू आहे.





