Pune: ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली अश्लील व्हिडिओ चित्रीकरण; पुण्यात पत्रकार रोहन कदमवर गुन्हा दाखल

Pune: पुणे श्रमिक पत्रकार संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.

Updated On:
Pune: ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली अश्लील व्हिडिओ चित्रीकरण; पुण्यात पत्रकार रोहन कदमवर गुन्हा दाखल

Pune: शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात एका महिलेचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या गंभीर प्रकरणी पत्रकार रोहन कदम याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिलेने याबाबत जबाब नोंदवला होता.

स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली संबंधित पत्रकार रोहन कदम याने महिलेचे परवानगीशिवाय अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत संबंधितावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Pune News : 'सिल्व्हर मोटर्स- निसान'च्या नव्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन; 'सिल्व्हर जुबिली' ग्रुपची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी

2026-04-10 18:36:59

Pune News : 'सिल्व्हर मोटर्स- निसान'च्या नव्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन; 'सिल्व्हर जुबिली' ग्रुपची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी

Pune: कैलास सत्यार्थी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026' जाहीर; पुण्यात रंगणार दिग्गजांचा गौरव सोहळा

2026-04-07 19:09:50

Pune: कैलास सत्यार्थी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026' जाहीर; पुण्यात रंगणार दिग्गजांचा गौरव सोहळा

Crime News : क्रूरतेचा कळस! दुसऱ्या लग्नासाठी अडथळा ठरेल म्हणून ११ महिन्यांच्या मुलाचा आईनेच केला खून

2026-04-07 14:52:51

Crime News : क्रूरतेचा कळस! दुसऱ्या लग्नासाठी अडथळा ठरेल म्हणून ११ महिन्यांच्या मुलाचा आईनेच केला खून

Pune News : विमाननगरमधील अ‍वैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा

2026-04-06 22:36:24

Pune News : विमाननगरमधील अ‍वैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा

Pune: आकाश ऍडव्हर्टीसिंगचा वर्धापन दिन उत्साहात; मतिमंद विद्यालयात धान्य व खाऊ वाटप

2026-04-06 18:23:49

Pune: आकाश ऍडव्हर्टीसिंगचा वर्धापन दिन उत्साहात; मतिमंद विद्यालयात धान्य व खाऊ वाटप