ZP Election Result 2026 : जिल्हा परिषदांच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये कोणाची आघाडी?
ZP Election Result 2026: सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या पहिल्या कलानूसार, महायुतीने बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सध्या राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 100 जागांचा कल हाती आला आहे. सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या पहिल्या कलानूसार, महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. ZP Election Result 2026
यात भाजप- 38, शिवसेना शिंदे गट- 22, राष्ट्रवादी अजित पवार गट- 19, काँग्रेस- 11, शिवसेना ठाकरे गट- 6, राष्ट्रवादी शरद पवार गट- 0, इतर- 5 जागांवर आघाडीवर आहेत. ZP Election Result 2026
दरम्यान, मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा:
INC High Profile Meeting: काँग्रेसची ८ राज्यांसोबत मोठी बैठक ; बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित





