ZP Election Result 2026 : ‘आजचा विजय पाहण्यासाठी दादा पाहिजे होते’, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अश्रु अनावर
ZP election Result 2026 : अजित पवार यांनी भाजप साठी सुपे पंचायत समिती गण आणि दोन जागा सोडल्या होत्या. त्या दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

ZP election Result 2026 : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यात पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. बारामतीत आतापर्यंत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या दोन जागा जिंकल्या. या विजयानंतर अनेकजण भावुक होत असल्याचे दिसत आहे.
‘आजचा विजय पाहण्यासाठी दादा आपल्यात पाहिजे होते’, असे म्हणत विजयी उमेदवार श्यामल वाबळे यांना अश्रु अनावर झाले. दरम्यान, अजित पवार यांनी भाजप साठी सुपे पंचायत समिती गण आणि दोन जागा सोडल्या होत्या त्या दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
Satara ZP Election 2026: सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी
शिरसुफळ पंचायत समिती गणातून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे विजयी आणि सुपे पंचायत समिती घनातून उज्वला पोपट खैरे या विजयी झाल्या आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे
हेही वाचा:
Pune News: पुण्याच्या ५८ व्या महापौर पदी मंजुषा नागपुरे; काँग्रेस, राष्ट्रवादीची माघार





