Stock market : झोमॅटोच्या शेअरची आगेकूच, सेन्सेक्स निर्देशांकात समावेश झाल्याचा परिणाम…

मुंबई – नवीन तंत्रज्ञानावर आधारित झोमॅटो कंपनीची शेअर बाजारावर गेल्या वर्षी नोंदणी झाली. इतर कंपन्यांना शेअर बाजारात फारशी चांगली कामगिरी करता आली नसले तरी झोमॅटोने मात्र या वर्षात शेअर बाजारात चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत सेन्सेक्स संदर्भातील 30 मोठ्या कंपन्यात झोमॅटोचा समावेश झाला आहे. तर जेएसडब्ल्यू कंपनी सेन्सेक्सच्या यादीतून बाहेर पडली आहे.
त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीच्या शेअरचा भाव मात्र अडीच टक्क्यांनी कमी होऊन 953 रुपये 55 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला. त्यामुळे सोमवारी झोमॅटो कंपनीच्या शेअरचा भाव साडेतीन टक्क्यांनी वाढून 273 रुपये 60 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला. दिवसभरात या कंपनीच्या शेअरचा भाव जवळजवळ आठ टक्क्यांनी वाढला होता. या घडामोडी बद्दल कंपनीच्या कंपनीच्या व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.
हे यश केवळ व्यवस्थापनाचे नसून आमच्या डिलिव्हरी पार्टनरचे आहे असे सांगण्यात आले. आगामी काळात कंपनी विस्तारीकरणाचे काम हाती घेणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना चांगला परतावात देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्विगी कंपनीची गेल्या पंधरवड्यात शेअर बाजारावर नोंदणी झाली आहे. या कंपनीलाही देशातील गुंतवणूकदारानी चांगला प्रतिसाद दिला असून या शेअरच्या किमती बर्यापैकी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानावर आधारित इतर कंपन्या आशावादी झाल्या आहेत आणि शेअर बाजारावर नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजले जाते.




