Zomato : ‘झोमॅटो’ने ‘वुमन्स डे’ निमित्त महिलांना दिली ‘ही’ मोठी भेट

अनेक लोक घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण किंवा कोणतेही खाद्यपदार्थ मागविण्यासाठी झोमॅटोचा वापर करतात. झोमॅटोद्वारे तुम्हाला तुमचे जेवण अगदी सहज घरपोच मिळते. झोमॅटोने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगरानी यांच्या हस्ते मुंबईतील झोमॅटोच्या पहिल्या ‘महिला रायडिंग सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले.
या रायडिंग सेंटरद्वारे महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे आता महिलाही झोमॅटोद्वारे जेवण वितरण करताना दिसणार आहेत.या केंद्राचे उद्दिष्ट महिलांची गतिशीलता आणि उपजीविकेच्या संधी वाढ करणे असा आहे. झोमॅटो मुंबई आणि अहमदाबादसह विविध शहरांतील केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण सुलभ करणार आहे.
महिलांसाठीच्या उपजीविकेसाठी उपक्रम सुरु
झोमॅटोने सुरु केलेला हा उपक्रम महिलांसाठीच्या उपजीविकेसाठीचा कार्यक्रमाचा भाग आहे. लिंगभेद दूर करणे आणि लॉजिस्टिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधी देऊन त्यांना सक्षम करणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या झोमॅटो संलग्न कंपन्यांमधील भूमिकांसाठी १०,००० महिलांना प्रशिक्षण देणे हे उद्दिष्ट असणार आहे.





