डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! भारतीय वंशाच्या जोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवड

Zohran Mamdani। अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमध्ये एक उल्लेखनीय घटना घडली आहे. भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी महापौरपदी निवडून आले आहेत. त्यांनी शानदार कामगिरी करत महापौरपदाची निवडणूक जिंकली. गेल्या १०० वर्षात ममदानी हे न्यूयॉर्कचे सर्वात तरुण आणि पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ममदानी जिंकू इच्छित नव्हते, त्यासाठी त्यांनी ममदानी याना अनेकवेळा धमकीवजा इशारा देखील दिला होता,परंतु आता या विजयाने ट्रम्प यांनाचा धक्का बसला आहे.
जोहरान ममदानी हे अवघ्या ३४ व्या वर्षी न्यूयॉर्क शहराचे महापौर झाले आहेत. निवडणूक सर्वेक्षणात ते या पदासाठी सर्वात लोकप्रिय उमेदवार म्हणून उदयास आले होते. ममदानी हे प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत आणि ते स्वतः एक माजी रॅपर (संगीत कलाकार) आहेत. त्यांचा जन्म युगांडातील कंपाला येथे झाला. मात्र, ते वयाच्या सातव्या वर्षी न्यूयॉर्कला गेले आणि नागरिक झाले.
Congratulations to all the Democratic candidates who won tonight. It’s a reminder that when we come together around strong, forward-looking leaders who care about the issues that matter, we can win. We’ve still got plenty of work to do, but the future looks a little bit brighter.
— Barack Obama (@BarackObama) November 5, 2025
ममदानी यांचा कोणाशी होता सामना ? Zohran Mamdani।
न्यू यॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ममदानीसोबत इतर दोन उमेदवार रिंगणात होते. न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, जरी ते पूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य होते. रिपब्लिकन पक्षानेही कर्टिस स्लिवा यांना उमेदवारी दिली होती, परंतु कुओमो आणि कर्टिस निराश झाले होते. दोन्ही उमेदवार मतदानात मागे होते.
ओबामांकडून ममदानी यांचे अभिनंदन Zohran Mamdani।
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ममदानी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, “विजयी झालेल्या सर्व डेमोक्रॅटिक उमेदवारांचे अभिनंदन. हे सिद्ध करते की जेव्हा आपल्याकडे मजबूत आणि दूरदर्शी नेते असतात जे आपल्यासमोरील समस्यांची काळजी घेतात, तेव्हा आपण जिंकू शकतो. आपल्याकडे अजूनही बरेच काम करायचे आहे, परंतु भविष्य आता उज्वल दिसते.” जोहरान ममदानी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलही आक्षेपार्ह विधाने केली होती.





