ZIM vs AFG : आयसीसीने अफगाणिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, पराभवानंतर केली मोठी कारवाई

ZIM vs AFG ICC fines Afghanistan Team : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात पार पडला. ज्यामध्ये यजमान झिम्बाब्वे संघाने घरच्या मैदानावर अफगाणिस्तानला एक डाव आणि 73 धावांनी धूळ चारत 12 वर्षांचा घरच्या मैदानावरील विजयाचा दुष्काळ संपवला. या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघावर कठोर कारवाई केली, ज्यामुळे एक प्रकारे पराभवानंतर संघाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी झाले आहे.
फलंदाजांचा फ्लॉप शो, अन् गोलंदाजांचा टाइमपास नडला –
या सामन्यात झिम्बाब्वेने पहिल्या डावात 359 धावा उभारल्या, तर अफगाणिस्तानला दोन्ही डाव मिळूनही तेवढ्या धावा करता आल्या नाहीत. फलंदाजीतील अपयशासह गोलंदाजीतील स्लो ओव्हर रेटमुळे अफगाणिस्तानच्या अडचणी वाढल्या. सामन्यात निर्धारित वेळेत पाच षटके कमी टाकल्याने सामनाधिकारी रिची रिचर्ड्सन यांनी प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून 25 टक्के रक्कम कपात करण्याची शिक्षा ठोठावली. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ही चूक मान्य केल्याने याबाबत कोणतीही सुनावणी झाली नाही.
Afghanistan have been penalised for slow over-rate in the one-off #ZIMvAFG Test.
More details ⬇️https://t.co/Xcg0GuPdYW
— ICC (@ICC) October 23, 2025
झिम्बाब्वेने अफगाणिस्तानशी साधली बरोबरी –
या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळले गेले होते. यापैकी अफगाणिस्तानने दोन सामने जिंकले, तर झिम्बाब्वेने एका विजयासह एक सामना अनिर्णित ठेवला होता. हरारे येथील या विजयासह झिम्बाब्वेने अफगाणिस्तानविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली.
हेही वाचा – Yuzvendra Chahal Post : ‘आईची, शपथ खा की, तू…’, पोटगीच्या चर्चेवरुन युझीचा धनश्रीवर अप्रत्यक्ष निशाणा
या पराभवाने आणि आयसीसीच्या दंडामुळे अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला असून, पुढील सामन्यांमध्ये सुधारणा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.





