ZIM vs AFG 1st T20 : थरारक सामन्यात झिम्बाब्वेनं मारली बाजी, शेवटच्या चेंडूवर अफगाणिस्तानला केलं पराभूत…

Zimbabwe vs Afghanistan 1st T20 : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे राशिद खानच्या संघाला तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अफगाणिस्तानचा झिम्बाब्वे दौरा बुधवार, 11 डिसेंबर रोजी पहिल्या टी-20 ने सुरू झाला. हा सामना ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नव्हता. या थरारक अशा सामन्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. झिम्बाब्वेने शेवटच्या चेंडूवर पहिला टी-20 जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Zimbabwe win a last-ball thriller to take a 1-0 lead in the series ⚡#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3pB5B pic.twitter.com/DyCYkTNKPb
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
अफगाणिस्तानने पहिल्या टी-20 सामन्यात 20 षटकात 6 विकेट गमावत 144 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान झिम्बाब्वेनं शेवटच्या चेंडूवर 4 विकेट्स (ZIMBABWE WON BY 4 WICKETS) राखून सामना जिंकला. या सामन्यात, शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला 11 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या 6 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण शेवटी झिम्बाब्वेनं बाजी मारली. शेवटचे षटक अजमतुल्ला उमरझाईनं टाकले, पण या षटकात ताशिंगा मुसेकिवा यानं कुठलीही घाई न करता (4, 2, 2, 0, 2, 1) संयमी खेळी करून 11 धावा काढत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
झिम्बाब्वेच्या विजयाचा नायक सलामीवीर ब्रायन बेनेट ठरला ज्याने 49 धावांची शानदार खेळी खेळली, तर अफगाणिस्तानच्या पराभवाचा दोषी नवीन उल हक होता ज्याने एका षटकात 13 चेंडू टाकले ज्यात त्याने एकूण 19 धावा दिल्या. हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले. झिम्बाब्वेचा अफगाणिस्तानविरुद्ध ओव्हरआॅल हा टी-20 मध्ये हा दुसरा विजय आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये 33 धावांवर संघाने 4 विकेट गमावल्या होत्या तर 58 धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये गेला होता. मात्र, यानंतर करीम जनात (49 चेंडूत 54) आणि मोहम्मद नबी (27 चेंडूत 44) यांनी 79 धावांची भागीदारी करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले आणि संघाला 20 षटकात 6 बाद 144 धावा उभारत्या आल्या.
प्रत्युत्तरात 145 या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने अतिशय संयमानं फलंदाजी केली. 14व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या 2 गडी गमावून 88 धावा होती. संघाला शेवटच्या 36 चेंडूत 57 धावांची गरज होती. झिम्बाब्वेला मोठ्या षटकाची गरज होती, ती उणीव गोलंदाज नवीन उल हकने 15व्या षटकातच भरून काढली. नवीन उल हकचे हे षटक 13 चेंडूंचे होते, ज्यात त्याने 6 वाइडसह 1 नो बॉल टाकला. होय, अशाप्रकारे या षटकात त्याने एकूण 19 धावा खर्च केल्या आणि हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले.
IND vs AUS 2nd Test : विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचे टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज दडपणाखाली – वॉर्नर
कर्णधार राशिद खानने हुशारी दाखवत पुढच्या षटकात आक्रमण करत ब्रायन बेनेट आणि रायन बर्लच्या रूपाने दोन मोठे बळी घेतले. मात्र, त्याआधीच नवीन उल हकने झिम्बाब्वेचा मार्ग सुकर केला होता, त्यामुळे यांचा दबाब झिम्बाब्वेवर पडला नाही. पुढे झिम्बाब्वेने 18व्या षटकात 4 धावा, 19व्या षटकात 10 धावा आणि 20व्या षटकात 11 धावा काढत रोमहर्षक विजयाची नोंद केली. झिम्बाब्वेकडून ब्रायन ब्रेनेटने 49 आणि डायन मेयर्सने 32 धावा केल्या. शेवटी, तशिंगा मुसेकिवा 13 चेंडूत 16 धावा करून आणि वेलिंग्टन मसाकादझा 2 चेंडूत 6 धावा करून नाबाद संघाच्या विजयासह माघारी परतले.



