Zilla Parishad Election : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची आज सांगता; ७ फेब्रुवारीला मतदान
Zilla Parishad : पुढील दोन दिवस डोअर-टू-डोअर प्रचाराला वेग येण्याची शक्यता

Zilla Parishad Election :राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यानुसार जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल.
मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले होते. तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता तात्काळ संपुष्टात येईल.
नियमानुसार रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जाहीर, सभा प्रचार करता येणार नाही. मात्र, जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन वैयक्तिक संपर्क साधून प्रचार करण्यास परवानगी असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. Zilla Parishad Election
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील कलम 28 ब (1) नुसार मतदानास सुरुवात होण्याच्या आधीच्या 24 तासांत तसेच मतदानाच्या दिवशी कोणतीही सार्वजनिक सभा, प्रचारफेरी किंवा जाहीर प्रचार करता येणार नाही. .Zilla Parishad Election :
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात एकही मोठी जाहीर सभा किंवा भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली नाही. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजप, शिवसेने सुद्धा कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या नाहीत. केवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काही मोजक्याच सभा पार पडल्या.
डोअर-टू-डोअर प्रचाराला वेग
जाहीर प्रचार बंद झाल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटी घेऊन प्रचार करण्यास मुभा असल्याने पुढील दोन दिवस डोअर-टू-डोअर प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Zilla Parishad Election
हेही वाचा:
Pune news : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! आज शहरातील अनेक भागात होणार बत्ती गुल






