महाराष्ट्रात काँग्रेसला झटका ! झीशान सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांकडून ‘या’ जागेवरून तिकीट

zeeshan siddiqui । राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झीशान सिद्दीकी हे सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या तिकिटावर ही निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्वमधून वरुण देसाई यांना तिकीट दिले आहे.
झीशान सिद्दीकी हे आतापर्यंत काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षाच्या वतीने एबी फॉर्म दिला आहे. वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दी यांच्यासह आणखी चार नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झाले आहेत. या नेत्यांमध्ये तासगाव कवठे येथील संजय काका पाटील, वरुड मुर्शीमधून देवेंद्र भुयार, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आणि भाजपचे माजी खासदार आणि लोहा कंधारमधून प्रतापराव चिखलीकर यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी… pic.twitter.com/cspmBAc1iO
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2024
‘राष्ट्रवादीसोबत काम करणे काही नवीन नाही’ zeeshan siddiqui ।
अजित पवार गटात सामील झाल्यानंतर ते म्हणाले की, राष्ट्रवादीसोबत काम करणे काही नवीन नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीसोबत काम केले होते. आता राष्ट्रवादीत काम करू. ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसचा प्रश्न आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दबावाखाली आपली जागा दुसऱ्याला देत आहे.’
‘माझ्या वडिलांचे अपूर्ण काम मी पूर्ण करेन’ zeeshan siddiqui ।
माझ्या वडिलांनी अपूर्ण ठेवलेला लढा मी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझे वडील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मी मुंबई पोलिसांना सर्व माहिती दिली आहे. मी X वर सर्वांशी याबद्दल माहिती देखील शेअर करत होतो. ते म्हणाले की, माझ्या वडिलांनी लोकांसाठी प्राण गमावले. आमचे कुटुंब हे सर्वांसाठी काम करणारे कुटुंब आहे. असे काही लोक आहेत जे पैशासाठी कोणाचे घर उध्वस्त करतात. मला आशा आहे की माझ्या कुटुंबाला न्याय मिळेल.





