झाकिर नाईकच्या अडचणीत वाढ:मलेशिया सरकारकडून नोटीस जारी
नवी दिल्ली : मलेशिया सरकारने इस्लामिक गुरू झाकीर नाईकला चौकशीसाठी बोलावले आहे. यासाठी मलेशियाच्या पोलिसांनी नाईकला एक नोटीस पाठवली असून चौकशीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील तीन वर्षांपासून झाकिर नाईक मलेशियात आक्षेपार्ह आणि माथे भडकावणारे भाषण करत आहे त्यामुळे त्याला ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मलेशियाचे गृहमंत्री मुहिद्दीन यासिन यांनी याविषयी माहिती दिली. झाकिर नाईक आणि अन्य तीन व्यक्तींची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. तसेच नाईक मागील तीन वर्षांपासून लोकांच्या भावना भडकावण्याचा आणि धार्मिकबाबतीत आक्षेपार्ह भाषण करत असल्याचा त्याच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे त्याला चौकशीस पाचारण केले आहे. दरम्यान, याच प्रकरणात चीनच्या डोंग जोंग यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे तसेच यांच्या विरोधात पर्याप्त पुरावे मिळाले तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुहिद्दीन यासिन यांनी म्हटले.





