Zaheer Sagarika Baby : झहीर-सागरिकाच्या घरी आठ वर्षांनंतर हालला पाळणा, ‘हे’ ठेवलं मुलाच नाव

Zaheer Khan and Sagarika Ghatge Welcome Baby Boy : आयपीएल २०२५ च्या मध्यावर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. झहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या नवजात बाळाचे नावही ठेवले आहे. या जोडप्याचे फोटो पाहून चाहते खूप आनंदी आहेत आणि त्यांचे अभिनंदन करत आहेत.
२०१७ मध्ये झहीर खानने ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले. दोघांची भेट एका पार्टी दरम्यान झाली होती. तिथून त्यांची मैत्री सुरू झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. झहीर खान मुस्लिम धर्माचा आहे, तर सागरिका हिंदू धर्माची आहे, पण प्रेमाखातर दोघांनीही धर्माची पर्वा न करता एकमेकांना आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला.
Zaheer Khan & his wife blessed with a Baby Boy ❤️
– Congratulations to both of them. pic.twitter.com/3vVj5gVuMD
— Johns. (@CricCrazyJohns) April 16, 2025
८ वर्षांनंतर झहीर-सागरिकाच्या घरी हालला पाळणा –
View this post on Instagram
आता लग्नाच्या ८ वर्षांनंतर दोघेही पालक झाले आहेत. याबाबत सागरिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर ही माहिती देताना लिहिले की, ‘घरात एका बाळाचा जन्म झाला आहे, ज्याचे नाव फतेह सिंग खान आहे.’ व्हायरल झालेल्या होत असलेल्या फोटोमध्ये, सागरिका चेहऱ्यावर हास्य घेऊन आणि झहीर खानच्या खांद्यावर हात ठेवून बसलेली दिसते, तर झहीर त्याच्या मुलाला मांडीवर घेऊन हसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये झहीर खान आपल्या मुलाचा हात धरलेला दिसतोय. हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत आणि चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.





