मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांचं नुकतंच लग्न झालं. लग्नानंतर दोघे हनिमूनलाही जाऊन आले. हनिमूनचे फोटो देखील त्यांनी शेअर केले होते. यानंतर त्यांनी आता आपल्या नेहमीच्या कामांना सुरुवात केली आहे. लग्नाला काहीच दिवस झालेले असताना झहीरनं त्याच्याबरोबर धोका झाल्याचं म्हटलं आहे. सोनाक्षीच्या एका पोस्टवर झहीरने एक कमेंट केली आहे. सध्या त्याच्या या कमेंटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. https://www.instagram.com/reel/C9g2AZvxrVQ/?utm_source=ig_embed&ig_rid=40008489-38ce-4dfa-9d3f-1160fe59c380 अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप अँक्टिव असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्नानंतर डेट नाइट केली. डेट नाइटसाठी सोनाक्षी नेहमीप्रमाणे तयार झाली. मेकअप करत असताना सोनाक्षीनं तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला. सोनाक्षीनं त्यात तिचा संपूर्ण मेकअप कसा केला हे शेअर केलं आहे. ज्याला तिनं डेटिंग करणे कधीही थांबवू नका. लग्नानंतरच्या डेटसाठी 30 मिनिटांत तयार व्हा, असं कॅप्शन दिलं आहे.तिच्या या व्हिडीओवर झहीरनं कमेंट केली आहे. झहीरने काय केली कमेंट ? सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेल्या व्हिडिओवर झहीरने एक कमेंट केली आहे. “माय लॉर्ड माझी फसवणूक झाली आहे” अशी कमेंट झहीरने केली आहे. त्याच्या या कमेंटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसेच त्याला ट्रोलदेखील केले जात आहे. सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून रोजी रजिस्टर मॅरेज केलं. जवळचे मित्र मैत्रिणी त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. दोघेही 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.