Yugvendra Chahal : युजवेंद्र चहल जीवन संपवणार होता; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा, म्हणाला क्रिकेटमधूनही…

Yugvendra Chahal : भारताचा स्टार क्रिकेटर म्हणून नावाजलेला खेळाडू युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री आणि युजवेंद्र यांनी आपल्या नात्याला पूर्वविराम देत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० मार्च २०२५ वांद्रे हायकोर्टात घटस्फोटाची सुनावणी पार पडली आणि दोघेही विभक्त झाले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतेवेळी युजवेंद्रने आपल्या आणि धनश्री यांच्यातील नात्यामध्ये असलेली अनबन बोलून दाखवत धक्कादायक खुलासा केला आहे. नात्यामध्ये कटुता वाढत गेली आणि मानसिक तणाव देखील वाढल्याने आत्महत्या करण्याचा विचार होतो, असं धक्कादायक वक्तव्य युजवेंद्रने मुलाखतीवेळी केलं आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मुलाखतीत हे सर्व सांगताना तो भावूकही झाला होता.
नेमकं काय म्हणाला युजवेंद्र चहल?
मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मी स्वतःच्या आयुष्याला त्रासलेलो. 2 तास मी रडयाचो आणि 2 तास झोपायचो… असं जवळपास 40 ते 45 दिवस सुरु होतं. मला क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा होता. मी क्रिकेटमध्ये इतका व्यस्त होतो की मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी या गोष्टी माझ्या मित्रासोबत शेअर केल्या.
मी दोन्हीकडे वेळ देत होतो, पण नात्याबद्दल विचार करायला वेळ नव्हता आणि प्रत्येक दिवशी वाटायचं की आता बस्स झालं… सोडून द्या… प्रत्येकाचं आपलं स्वतःचं आयुष्य असतं आणि लक्ष्य असतात. एक जोडीदाराच्या नात्याने प्रत्येक प्रसंगात साथ हवी असते. असं युजवेंद्रने सांगितलं आहे.
मी कोणाहीसोबत दगाबाजी केली नाही
खरंतर धनश्री आणि युजवेंद्र यांच्यात बऱ्याच काळापासून हे सुरू होतं. पण त्यांनी ठरवलं होतं की विभक्त होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत काहीही बोलायचं नाही आणि सोशल मीडियावर देखील सामान्य कपल म्हणून राहायचं असा खुलासा त्याने केला आहे. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा अनेकांनी मला दगाबाज म्हटलं. पण मी कोणाहीसोबत दगाबाजी केली नाही, असं युजवेंद्र चहन याने स्पष्ट केलं आहे.





