‘गुजरात सरकार माझा छळ करतंय…’ ; TMC खासदार युसूफ पठाण यांचा आरोप ; उच्च न्यायालयात धाव

Yusuf Pathan Allegation । तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटर युसूफ पठाण यांनी गुजरात सरकारवर आपला छळ केल्याचा आरोप केलाय. युसूफ पठाण यांना वडोदरा महापालिकेकडून अतिक्रमणाची नोटीस मिळाली होती, त्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. याप्रकरणी युसूफ पठाण यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. त्यामुळे गुजरात उच्च न्यायालयात टीएमसीला नोटीस पाठवून स्पष्टीकरणही मागवण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना वडोदरा महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती. याबाबत युसूफ पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून २०१२ सालीच ही जागा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्याचे सांगितले. आणि सन 2014 मध्ये महामंडळाने वेगळा प्रस्ताव आणून राज्य सरकारकडे पाठवला.
मला त्रास देण्याचा प्रयत्न Yusuf Pathan Allegation ।
याबाबत उच्च न्यायालयाने 10 वर्षांपासून कोणतीच कारवाई का केली नाही? असा सवाल केल्यानंतर त्यांनी, “मी नुकताच लोकसभा निवडणुकीत निवडून आलो असून, मी दुसऱ्या पक्षातून निवडून आल्यामुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असा आरोप त्यांनी केलाय. तसेच “गेल्या 10 वर्षांपासून काहीही केले नाही आणि अचानक निवडणूक निकालानंतर 6 जून रोजी नोटीस पाठवण्यात आली असेही त्यांनी म्हटले.त्यासोबतच “महामंडळाच्या प्रस्तावानंतर तो पुन्हा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला, त्याची गरज नाही, कारण ही जागा राज्य शासनाची नसून महापालिकेची आहे. आम्ही तो काढला नाही तर याठिकाणी थेट बुलडोझर येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
काय आहे हे प्रकरण ? Yusuf Pathan Allegation ।
6 जून रोजी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि TMC खासदार युसूफ पठाण यांना सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. यानंतर महापालिकेच्या माजी नगरसेवकाने या जागेवर केलेला कथित कब्जा बेकायदेशीर ठरवून महापालिकेकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर युसूफ पठाण यांना नोटीस पाठवण्यात आली.
हेही वाचा
बिहारमध्ये 65% आरक्षण रद्द : नितीश कुमारांचा निर्णय का बदलला?, वाचा सविस्तर संपूर्ण प्रकरण





