निवडणुकीत मोठ्या अपयशानंतर वायएस जगन मोहन रेड्डी यांनी ईव्हीएमबाबत व्यक्त केली शंका; म्हणाले “लोकशाहीचा खरा आत्मा…”

YS Jagan Mohan Reddy On EVM| वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्यावर भर दिला आहे. आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मोठा दावा केला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांत झालेल्या दारूण पराभवानंतर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दावा केला की, प्रत्येक प्रगत लोकशाहीत मतपत्रिका वापरल्या जातात. तर भारतातच ईव्हीएमचा आग्रह का धरला जात आहे? आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा जपण्यासाठी आपणही त्याच दिशेने वाटचाल केली पाहिजे. न्याय नुसताच होत नाही. तर तो दिसला पाहिजे. तसेच लोकशाही नुसती प्रस्थापित न होता ती दिसायला हवी,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ लिहिली आहे.
Just as justice should not only be served, but should also appear to have been served, so should democracy not only prevail but must appear to be prevalent undoubtedly.
In electoral practices across the world in almost every advanced democracy, paper ballots are used, not EVMs.…
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) June 18, 2024
आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले. तर लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ चार जागा जिंकता आल्या. राज्यातील१७५ विधानसभा जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १६४ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत या आघाडीने २५ पैकी २१ जागा जिंकल्या. दरम्यान,एकीकडे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हॅक झाल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दिलेला सल्ला चर्चेत आला आहे.
हेही वाचा:
मोठी बातमी! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान





