Beed Crime : परळी येथील एका १८ वर्षांच्या तरुणाला टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तरुणांकडून शिवराज दिवटे याला लाथाबुक्यांनी, पट्याने मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे याला मारहाण केली होती. यातील मारहाण करणारे बहुतांशी तरुण १८ वर्षांचे आहेत. बीड जिल्ह्यातील लहान मुलांमध्ये भाईगिरी आणि गुंडगिरीची नशा किती भिनली आहे. याचा पुरावा ही व्हिडिओ क्लिप असल्याचे समोर आले आहे. अशातच आता या मारहाण प्रकरणातील टोळीचा मोरक्या समाधान मुंडे याची एक अॅाडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये काय? ‘तू माझा भाई रोहितला पण राँग बोलला. तुझे तीन शब्द राँग झालेत. नाय याच्या ***वर तीन कोयते घातले तर बघ. तू परळीला ये तुला दाखवतो.’ असे या व्हायरल होणाऱ्या अॅाडिओ क्लिपमध्ये मुंडे शिवराज दिवटे याला धमकी देत असल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी तात्काळ घटनेची दखल घेत २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय स्वरुप देण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. यावर कॅावत म्हणाले या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, तसेच सोशल मीडियावर प्रशोभक पोस्ट करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आरोपी विविध जाती आहेत. एका जातीचे नाहीत असे देखील त्यांनी सांगितले. मारहाण प्रकरण शुक्रवारी बीड जिल्ह्यातील परळीतील एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. आरोपींनी शिवराज दिवटे याला याला तू भांडणात मध्ये का पडलात? या कारणावरून परळीतून अपहरण करून रत्नेश्वर मंदिर परिसरात नेले. तिथे त्याला लाठ्या, काठ्या आणि बेल्टने टोळक्याने अमानुष मारहाण केली होती. आरोपींनी तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मला मारहाण करताना दोन व्यक्तींनी पाहिले त्यामुळे आपली सुटका झाली, असे शिवराज दिवटे याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे.