Rajgurunagar News : गाडीला कट मारल्याच्या जुन्या वादातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिन्हेवाडीतील घटना
Rajgurunagar News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भररस्त्यात कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajgurunagar News : काही दिवसांपूर्वी गाडीला कट मारला, त्यातुन किरकोळ वाद झाला आणि त्याचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना तिन्हेवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि १०) घडली. शिवम बाळासाहेब करमारे वय २६ वर्ष असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. (Rajgurunagar News)
शिवम याच्या हातावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी शिवम याचा चुलतभाऊ आदित्य काळुराम करमारे दिलेल्या तक्रारी नुसार, तिन्हेवाडी येथे दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भररस्त्यात हा हल्ला करण्यात आला. (Rajgurunagar News)
शिवम दुचाकीने जात असताना तीनही मुलांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. कोयत्याने डोक्यावर, हातावर घाव घातले. त्यात रक्तस्त्राव होऊन तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिक आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला. (Rajgurunagar News)
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेत राक्षेवाडी येथुन तीनही आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांनी दिली. (Rajgurunagar News)
दिवाळी पाडव्याच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना भररस्त्यात घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे तिन्हेवाडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Rajgurunagar News)



