Pimpri : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
Updated On:

पिंपरी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २) रात्री गहुंजे येथे करण्यात आली. अजय लक्ष्मण म्हेत्रे (वय २६, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस अमलदार राजकुमार ईघारे यांनी गुरुवारी (दि. २) याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीच्या काठावर गहुंजे येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अजय म्हेत्रे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





