“तुमच्याच माणसाने तुमचा कार्यक्रम केला”; रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवताच सुप्रिया सुळेंनी कोकटेंना सुनावले

Manikrao Kokate Vs Supriya Sule | राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. यानंतर त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले. आता माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांना मानहानीची नोटिस बजावली आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकटे यांना चांगलेच सुनावले आहे.
दिंडोरी तालुक्यातील खेड येथे विविध विकास कामांच्या शुभारंभदरम्यान शनिवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जिल्ह्यातील लोकांविषयी काही बोलले की ते तक्रार करतात. पण मला काही केसची भिती वाटत नाही. करा केस..अब्रुनुकसानीचा दावा लावताय लावा… तुम्ही कामावर असतांना पत्ते खेळणार, तुमच्या मागील माणूस तुमचा व्हिडिओ काढणार. तुमच्याच माणसाने तुमचा कार्यक्रम केला की आमच्यावरच अब्रु नुकसानीचा दावा करणार…. हा कुठला न्याय आहे.”
“साधी गोष्ट आहे तुम्ही बसतात तर तुमच्याच मागचाच व्हिडीओ काढणार आहे. मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला की तुमच्या मागच्यानेच केला. मग अब्रुनुकसानीचा दावा तुमच्या मागे बसलेल्यावर टाकायचा की माझ्या रोहितवर टाकायचा?” असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला.
पत्ते तुम्ही खेळायचे आणि नोटीस आम्हाला पाठवायची
पुढे त्या म्हणाल्या, “मी सुप्रिया सुळे आहे. जो वार करेल तो समोरुन करेल. असा पाठिमागून करणार नाही. जे बोलायचं ते ‘डंके की चोट पर’, आपल्या मागे न ईडी, सीबीआय न कसल्या भानगडी. खाली हात आये ते और खाली हात जायेंगे.. पत्ते तुम्ही खेळायचे आणि नोटीस आम्हाला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या असं चालणार नाही,” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.Manikrao Kokate Vs Supriya Sule |
कर्जमाफीवर चर्चा कधी करणार?
“आज आपण कबुतरे, कुत्रे अशा गोष्टींवर चर्चा करतो. कर्जमाफीवर चर्चा कधी करणार? मुख्यमंत्री सरसकट कर्जमाफी देण्याविषयी बोलले होते. आता ओला दुष्काळ असतांना कुठे झाली कर्जमाफी, केंद्रात सत्ताधाऱ्यांकडे कर्जमाफीसाठी कोणी गेले का, मुख्यमंत्री वेळ देत नाही, मी माझी कामे दिल्लीत करून घेते. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत सर्व प्रश्न मांडले. सशक्त लोकशाहीत आम्हालाही लोकांच्या मागणी मांडण्याचा अधिकार आहे. दिल्लीत विरोधकांची कामे जास्त होतात. शेतीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सरकार काय करते ते लक्षात येत नाही. या प्रकरणी लक्ष घालावे,” अशी मागणी सुळे यांनी केली. Manikrao Kokate Vs Supriya Sule |
हेही वाचा :
‘प्रेमानंद महाराज हे विद्वान नाहीत अन् चमत्कारीही नाहीत’ ; जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे आव्हान





