पुणे | आपचे स्वच्छता आंदोलन ; महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सफाइ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात त्याची स्वच्छताही होत नसल्याने शहराच्या सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या बाबीकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने महापालिका भवनसमोर स्वच्छता आंदोलन करण्यात आले.
यावेळी रस्त्यावर फिनाइल टाकून रस्ता साफ करत महापालिका प्रशासनाचा निषेध करत यावेळी शहरातील स्वच्छतागृहांची महापालिकेने व्यवस्थित स्वच्छता करावी, या मागणी करिता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना भेटून फिनेल देण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांची भेट घेण्यापासून सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले फिनेल पुणे महापालिकेसमोरील रस्त्यावर ओतून आंदोलन केले.
पुणे महापालिकेने लवकरात लवकर बंद असलेली स्वच्छतागृहे सुरू करावीत अन्यथा आम आदमी पक्षाच्या वतीने शहरात तीव्र आंदोलने केले जाइल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, प्रवक्ते मुकूंद किर्दत, सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित मस्के, किरण कद्रे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.





