पिंपरी | धाकटी पंढरीत विठूरायाच्या गजर

खालापूर (वार्ताहर) – संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाकटी पंढरी, ताकई(साजगाव) विठुरायाच्या गजराने दुमदुमले. आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते.
धाकटी येथे पहाटे ५ वाजता खोपोलीतील उद्योजक राजन गोयल यांनी सपत्नीक विधीयुक्त पूजा केल्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी प्रारंभ केली.
तर खालापूर तालूक्यासह अलिबाग, पाली, सुधागड, पेण, पनवेल येथील २५ हजारांच्या आसपास भाविकांनी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर पुजेचा मानकरी राजन गोयल यांनी खोपोलीसह, खालापूर तालुक्यातील भाविकांना समृध्दी, आरोग्य निरोगी रहावो अशी प्रार्थना विठूरायाच्या चरणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम दर्शन घेतले.
खोपोली नगरपरिषद हद्दीतील ताकई येथे पुरातन काळापासून विठ्ठल-रखूमाईचे मंदिर उंच टेकडीवर आहे. याठिकाणी संत तुकाराम महाराज मिरची विकण्यासाठी येत असत, मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उधार घेतलेल्या मिरचीचे उधारी स्थानिकांनी न दिल्याने त्यांनी पांडुरंगाला बोंब मारली
त्यावेळी साक्षात पांडूरंगाने त्यांना दर्शन दिले तेव्हा या मं.िदराला बोंबल्या विठोबा असे नाव पडले असून पंढरपूरनंतर या धाकटी पंढरपुर म्हणून अन्यन्य साधारण महत्व आहे. गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था गुरव विकास प्रतिष्ठान – मुंबई गुरव न्याती समाज नालासोपारा, वसई, विरार यांना मंदिर परिसरात वृक्षारोपण केले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिकेने आवश्यक सुविधा पुरविल्या. धाकटी पंढरी देवस्थान अध्यक्ष अनंता पाटील, उपाध्यक्ष जयंवत पाटील, सचिव काळुराम पाटील, सदस्य अँड.रामदास पाटील, डॉ.सुनिल पाटील, नारायण पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी योग्य नियोजन केले आहे.





