तरुणपिढीने सोशल मीडियाच्या मागे न जाता ध्येय्य साध्य करावे : काकडे

नगर (प्रतिनिधी) – जिद्दीच्या, मेहनतीच्या व चिकाटीच्या बळावर ग्रामीण भागातील मुले मोठ्या पदावर पोहचत आहेत. आजच्या तरुण पिढीने सोशल मीडियाच्या मागे न जाता आठरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठले पाहिजे. आठरे यांनी मिळविलेले हे अभूतपूर्व यश आपल्या सर्वांसाठी गौरवाचे आणि अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते ऍड. शिवाजीराव काकडे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी या ग्रामीण भागातील संतोष आठरे यांची नुकतीच तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीच्या वतीने त्यांचा शेवगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, जि.प.सदस्या संध्या आठरे, भालसिंग पिंटू, जनशक्ती विकास आघाडीचे शहरप्रमुख सुनील काकडे, रवींद्र कुटे, राजेंद्र फलके, माजी सरपंच सुरेश नाना चौधरी उपस्थितीत होते.
ऍड. काकडे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील आपली माणसं जिद्दीने व चिकाटीने मोठी झाल्याने तालुक्यामध्ये युवकांमध्ये जिद्द निर्माण होते. अशा युवकांचाआदर्श ठेवून मोठी व्हावेत. जिथे संघर्ष आहे तिथे यश निश्चित असते.





