करडे येथे अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Updated On:

निमोणे: मांडवगण फराटा येथील २२ वर्षीय तरुण सुरज लक्ष्मण तोरणे याचा करडे गावाजवळील सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. सुरज हा आयएफबी (IFB) कंपनीत रात्रपाळी आटोपून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
हा अपघात रोड कंपनीपासून काही अंतरावर घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने करडे आणि मांडवगण फराटा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.





