Recharge Plan : रिलायन्स जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करण्यासाठी, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे एक उत्तम रिचार्ज प्लॅन आहे जो या दोन्ही कंपन्यांपेक्षा १५० रुपये स्वस्त आहे. बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारख्या सुविधा आहेत, या प्लॅनमध्ये किती जीबी डेटा उपलब्ध आहे आणि किती एसएमएस दिले जातात? यावर एक टाकुयात…. बीएसएनएल २९९ प्लॅन : बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्लॅन एक्सटेंशन कॅटेगरीत सूचीबद्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग मर्यादा ४० केबीपीएस पर्यंत कमी केली जाईल. २९९ रुपये खर्च केल्यावर, कंपनी तुम्हाला ३० दिवसांची वैधता देते. जिओ ४४९ प्लॅन : रिलायन्स जिओच्या ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रीपेड युजर्सना दररोज ३ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. बीएसएनएल प्लॅनप्रमाणे, हा प्लॅन देखील २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टार सारख्या जिओ अनलिमिटेड ऑफर, ५० जीबी क्लाउड स्टोरेज आणि ५० दिवसांसाठी जिओ फायबर/एअरफायबर सेवा यांचाही फायदा मिळतो. एअरटेल ४४९ प्लॅन : एअरटेल कंपनीच्या या ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, अमर्यादित ५G डेटा, २२ हून अधिक OTT अॅप्सचा मोफत अॅक्सेस, अपोलो २४/७ सर्कल मेंबरशिप आणि मोफत हॅलोट्यूनचा फायदा मिळतो. फरक काय आहे? बीएसएनएलच्या तुलनेत रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीचे हे प्लॅन १५० रुपये महाग आहेत. केवळ किंमतीतच नाही तर अतिरिक्त फायद्यांमध्येही फरक आहे, बीएसएनएल प्लॅन तुम्हाला कोणतेही अतिरिक्त फायदे देत नाही तर एअरटेल आणि जिओमध्ये तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळत आहेत. आता तुम्हाला काय हवे आहे ते निवडायचे आहे?