लाल रंगाच्या साडीतलं पूजाचं सौंदर्य पाहून तुम्ही व्हाल घायाळ!

मुंबई – दगडी चाळ, नीळकंठ मास्तर, सतरंगी रे, झकास अशा अनेक मराठी चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवत शेअर करत असते.
दरम्यान, नुकताच पूजाने दिवाळीच्या मुहूर्तावर लाल रंगाच्या साडीतला आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाल रंगाच्या साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले असून, तिच्या या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे. सध्या पूजाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.





