नवी दिल्ली : क्रिकेटचा सामना सुरु असताना स्टेडियममधून आवाज येत असतात. कुणी सिक्स, कुणी फोर असे ओरडत असते. फलंदाजाला ते ऐकू येत असते का? तो समोरुन येणाऱ्या चेंडूकडे पाहात असतो. तो कसा खेळायचा त्याप्रमाणे तो खेळतो. लोकांचे ऐकून तो चौकार आणि षटकार मारु लागला तर त्याची विकेट पडेल.
त्याचे संपूर्ण लक्ष समोरुन येणाऱ्या प्रत्येक चेंडूकडे असते. तुम्हीही जर कोण काय सांगते आहे यापेक्षा मला आज अभ्यास करायचा आहे, इतक्या वेळेत करायचा आहे. आज हा विषय, उद्या तो विषय असं केलंत तर तुम्हीही परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकता, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना काही महत्त्वच्या टिप्स दिल्या. मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या विषयाचा ताण घेऊ नका. मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हा माझं हस्ताक्षर चांगले नव्हते. पण माझ्या शिक्षकांनी माझं अक्षर सुधारण्यासाठी मेहनत घेतली, असे सांगितले.