Raj Thackeray : ‘जे पेरलं तेच उगवलं आणि तेच तुमच्या अंगावर आलं’; PM मोदींच्या व्हिडिओवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray : "गेल्या १२ वर्षातचं याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलच्या टीम आहेत. यांनी ज्या काही गोष्टी सुरू केल्या. जे पेरलं तेच उगवलं आणि तेच तुमच्या अंगावर आलं." असं विधान केलं.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओवर भाष्य करत काही सवाल उपस्थित केले आहेत. मी आताच त्यांचा तो व्हिडिओ पाहून आलो असं म्हणत राज यांनी नरेंद्र मोदींना काही सवाल केले.
जंतर मंतर आंदोलनामुळे देशभरातून केंद्र सरकारवर संताप व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियावरुन व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वर्गीय आईविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला.
या प्रकरणी नरेंद्र मोदींनी इंन्स्टाग्रामवरुन काल शुक्रवारी रात्री ११ वाजता एक व्हिडिओ शेअरे केला. या व्हिडिओत त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेविषयी खंत व्यक्त केली. याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले “गेल्या १२ वर्षातचं याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलच्या टीम आहेत. यांनी ज्या काही गोष्टी सुरू केल्या. जे पेरलं तेच उगवलं आणि तेच तुमच्या अंगावर आलं.” असं विधान केलं.
पुढं बोलताना राज यांनी “तुम्हाला बोलले हे चुकीचंच आहे; पण दुसऱ्यांना पण आया असतात. पक्षातील लोकांना पण सांगा की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत.” अशा शब्दांत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
नेमकं काय काय म्हणाले राज ठाकरे?
“अशा खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये हे मला शंभर टक्के मान्य आहे. मला पंतप्रधानानं सांगायचं आहे हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. याची गेल्या १२ वर्षातचं सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलच्या टीम आहेत. यांनी ज्या काही गोष्टी सुरू केल्या. जे पेरलं तेच उगवलं आणि तेच तुमच्या अंगावर आलं. तुम्हाला बोलले हे चुकीचंच आहे; पण दुसऱ्यांना पण आया असतात. पक्षातील लोकांना पण सांगा की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत.
पोलिसांना आदेश देणारे कधी माफी मागणार : राजे ठाकरेंचा सवाल
पंतप्रधानांनी सांगितलं की मुलांना माफ केलं; पण १२ वर्षांत तुमच्या लोकांनी जे काही केलं आहे त्याची माफी कोण मागणा? जंतर मंतर येथे तरुणांची डोकी फोडली… पोलिसांना कुणी आदेश दिला? ते कधी माफी मागणार? असा थेट सवाल केला. त्यांनी या वक्तव्यातून केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव घेतलं नसलं तरी त्यांनाच हा सवाल आहे का अशी चर्चा आता रंगली आहे.






