“तुम्ही वरिष्ठ आमदार, मंत्री असायला हवे होतात”; निलेश राणेंचा भरत गोगवलेंना टोला

Nilesh Rane On Bharat Gogawle| लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला आहे. तर महाविकास आघडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आता महायुतील वाद समोर येत आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी शिंदे गट आणि भाजप या जागेसाठी कमालीचे आग्रही होते.
परंतु यात नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांचा विजय देखील झाला. परंतु शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतून राणे पिछाडीवर होते. त्यामुळे राणेंनी नाराजी व्यक्त केली. या वादात शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उडी घेतली. त्यानंतर आता भरत गोगावले यांच्यावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश राणे काय म्हणाले? Nilesh Rane On Bharat Gogawle|
निलेश राणे यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हंटले की, “एकनाथ शिंदे यांचा मी मोठा भक्त आहे, त्यांचा फार मोठा मी चाहता आहे. माझ्याकडून किंवा नितेशकडून एकनाथ शिंदे यांना त्रास होईल असं काही होणार नाही. त्यांनी आमच्यासाठी जे केलंय ते आम्ही कधीही विसरणार नाही. विसरलो नाही.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होईल असं आमच्याकडून कधीही होणार नाही… pic.twitter.com/B8oxviVIsd
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 8, 2024
“आमदार भरत गोगावले यांना तरी गोष्टीचं वाईट वाटलं. मी त्यांना ऐवढं सांगू इच्छितो की, गोगावले जी तुम्ही सिनिअर आमदार आहात. मी माझ्या बाईटमध्ये कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती. त्याच्यामध्येही मी सांगितलं होतं की आमचे संबंध चांगलं आहेत. तुम्ही वरिष्ठ आमदार आहात. तुम्ही मंत्री असायला हवे होतात. पण, तुमच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. भविष्यात तुम्ही कधी भेटलात तर सविस्तर हा विषय तुम्हाला समजावून सांगेन. जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल,” असे म्हणत निलेश राणे यांनी गोगावले यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले होते भरत गोगावले ? Nilesh Rane On Bharat Gogawle|
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून राणेंना तिकीट मिळवून देण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा हात होता. त्यांच्यामुळेच राणेंना उमेदवारी मिळाली किरण सामंत यांना तिकीट वगळून राणेंना तिकीट दिले. राणेंना मिळालेली मतेही शिवसेनेचीच आहेत. हे निलेश आणि नितेश राणे यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे यापुढे बोलताना दोन्ही भावांनी सांभाळून बोलावे. नाहीतर येणाऱ्या पदविधरच्या निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच राणेंना गोगावले यांनी दिला होता.
हेही वाचा:





