Parag Tyagi Post : “तू माझं आयुष्य खूप सुंदर बनवलं, तू मला शिकवलंस की…”; लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पराग त्यागीची शेफालीसाठी भावूक पोस्ट

Parag Tyagi Post : कांटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं २७ जून २०२५ रोजी निधन झालं. तिच्या अकाली निधनाच्या बातमीने तिचा पती पराग त्यागीवर दुःखाचा डोंगर कोसळला. शेफालीच्या अकाली निधनाने परागच्या मनात खोलवर जखम झाली आहे. तिच्या निधनाला काही दिवसांमध्ये २ महिने पूर्ण होतील, मात्र पराग सोशल मीडिया पोस्टमधून शेफालीसोबतच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. अशातच त्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमधून त्याने शेफालीसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझं प्रेम, माझा जीव, माझी परी. जेव्हा १५ वर्षांपूर्वी मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला कळलेलं की तूच ती एकमेव व्यक्ती आहेस, असं परागने पोस्टमध्य्ये म्हटलं आहे. ११ वर्षांपूर्वी तू त्याच तारखेला माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
तू माझ्यावर खूप प्रेम केलं. तू माझं आयुष्य खूप सुंदर बनवलं. तू मला शिकवलंस की, मस्ती करत आयुष्य कसं जगायचं आणि आता मी आपल्या त्या सगळ्या आठवणींना उजाळा देत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन, अशी कबुली त्याने या पोस्टमधून दिली आहे. १२ ऑगस्ट २०१० ते पुढे कायम एकत्र असू., असं म्हणत परागने शेफालीविषयी आपल्या भावना व्यक्त करत तिच्यासोबतच्या आठवणींना उजाला दिला आहे.
View this post on Instagram
यासोबत परागने दोघांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचे फोटो त्याने एकत्र करून व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, अभिनेत्री शेफाली जरीवाला व पराग त्यागी यांनी प्रेमविवाह केला. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते. दोघेही आपल्या चाहत्यांसाठी सतत सोशल मीडियावर सक्रिय असायचे. मात्र, शेफाली या जगात नाही, हे दुःख पचवणं परागसाठी यातना देणारं आहे.
हेही वाचा : Mumbai-Goa Highway : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी..! मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल




