Salim Khan : सलमान खानच्या वडिलांची तब्येत बिघडली; सलीम खान तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल
Salim Khan : सलमान खानचे वडिल ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Salim Khan : बॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच सलमान खान तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल झाला आहे.
लीलावती रुग्णालयातून सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत तो काळजीत असल्याचे दिसत आहे. सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समजताच त्यांचे चाहते अधिक चिंतेत आहेत. त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांना नेमकं काय झाले आहे याची माहिती समोर आलेली नाही.
सलीम खान हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत. कथाकार जावेद अख्तर यांच्यासोबत सलीम-जावेद या जोडीने शोले, दीवार, डॉन, जंजीर, त्रिशूल आणि सीता और गीता सारख्या सुपरहिट चित्रपटांसह अनेक कल्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जावेद-सलीम यांच्या जोडीवर एक डॅाक्युमेंट्री फिल्म अॅमेझॅान प्राइमवर रिलीज करण्यात आली होती. त्या फिल्मला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांना दिला आहे.
हेलनशी दुसरे लग्न, अर्पिता खानला घेतले दत्तक
सलीम खानला यांना सलमान खानसह आणखी तीन मुले आहेत. अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा खान. त्यांनी अर्पितालाही दत्तक घेतले आहे. सलीम खान यांचे पहिले लग्न सलमा खानशी झाले होते, तर ज्येष्ठ अभिनेत्री हेलन ही त्यांची दुसरी पत्नी आहे. त्यांनी १९८१ मध्ये हेलनसोबत लग्ननीगाठ बांधली. सुरुवातीला त्यांचे कुटुंब त्यांच्या दुसऱ्या लग्नावर नाराज होते, परंतु त्यानंतर परिस्थिती सुधारली. आता ते सर्व एकत्र राहतात.
हेही वाचा : Natural Brain Boost: स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या वाढवायची आहे का? जाणून घ्या ५ जपानी उपाय!





