मुंबई – ‘द कपिल शर्मा शो’ ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या शोमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री अर्चना पूरण सिंह पर्मनंट गेस्ट म्हणून काम करतात. त्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत. कुटूंबासोबतचे आणि घरात काम करणाऱ्या भाग्यश्रीचेही मजेशीर व्हिडीओ आणि फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच अर्चना पूरण सिंहने पती परमित सेठीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरून काही नेटकऱ्यांनी अर्चना वाईट पद्धतीने टीका केली आहे. मात्र अर्चनाने देखील याला सडेतोड उत्तर दिले आहे.
अर्चनाने इन्स्टाग्रामवर “थोडा वेळ आणि एका मिनिटापूर्वी! गुगल मला आयुष्य किती छान आहे याची आठवण करून देत आहे,” अशा कॅप्शनसह एक फोटो शेअर केला होता. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘एका फ्रेममध्ये दोन पुरुष,’ तर महिला युजरनं लिहिले की, “तू स्त्री कमी आणि पुरुष जास्त दिसत आहेस. कपिल अगदी बरोबर म्हणतो की, रूपांतर करण्यास तुला बराच वेळ लागला असणार.”
View this post on Instagram
मात्र टीका करणाऱ्यांना अर्चनाने सडेतोड उत्तर दिले आहे. “एवढ्या लहान वयात इतके वाईट विचार आहेत तुझे. थोडा अभ्यास केला असता तर वयानं मोठ्या व्यक्तींशी कसं वागायचं हे कळालं असतं. सर्व वयोगटातील सर्व स्त्रियांचा आदर करायला शिका. जर स्त्रिया स्वतःच एकमेकींचा आदर करू शकत नाहीत तर तुम्ही पुरुषाकडून आदराची अपेक्षा कशी करू शकता?” असं उत्तर अर्चनानं दिलं आहे.दरम्यान,1992 मध्ये अर्चना पूरण सिंहने परमीत सेठीसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केले होते. आता हे जोडपे आर्यमन आणि आयुष्मान या दोन मुलांचे पालक आहेत.