‘तुम्ही मास्क वापरू नका; कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट’ म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Updated On:
‘तुम्ही मास्क वापरू नका; कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट’ म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली – मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि अत्यंत आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडणे असे सरकारकडून करोनाची पहिली लाट आल्यापासूनन सांगितले जात होते. मात्र सरकाने दिलेल्या या सूचनांवर एका दिल्लीमधील डॉक्टरने सोशलवर चुकीचा संदेश देणारा व्हिडियो शेअर करत सर्व सामान्यांची दिशा भूल केली आहे.

या व्हिडियोमध्ये दिल्लीतील डॉक्टर एमडी रेडिओलॉजिस्ट डॉ. तरुण कोठारी यांनी लोकांना  मास्क न वापरण्याचं आवाहन केलं. यामध्ये ते म्हणाले होते, “सरकार जरी मास्क वापरण्यास सांगत असतील  तरी सुद्धा तुम्ही आजिबात मास्क वापरू नका. कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट आहे .

तुम्ही  मास्क वापरल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवेल. मास्क वापरल्यास श्वसनासंबंधी आजार होतील. आणि या आजारासाठी तुम्ही जर रुग्णालयात गेला तर तुमच्यावर चुकीचे उपचार केले जातील आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमची गणना कोरोना बळीत होईल. त्यामुळे मास्क वापरणं सोडा, आणि या व्हिडिओला देशभरात व्हायरल करा.”  असं त्यांनी या व्हिडियोत म्हणत मास्क न वापरण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडियो व्हायरल होताच  दिल्लीतील सायबर सेलने कोठारींविरुद्ध जामीनपात्र गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे. कोठारी यांच्यावर कलम 117 म्हणजे दहापेक्षा अधिक लोकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, कलम 188 म्हणजे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, आणि कलम 269 म्हणजे जाणूनबुजून एखाद्याचे आयुष्य धोक्यात आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Siddharth Jadhav : 'एवढी कसली घाई?' सिद्धार्थ जाधवने 'ती' बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट

2026-08-25 11:40:22

Siddharth Jadhav : 'एवढी कसली घाई?' सिद्धार्थ जाधवने 'ती' बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट

Riteish Deshmukh : "कृपया मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांचं देणं लागतो," रितेश देशमुख कोणाच्या शोधात?

2026-08-24 13:05:09

Riteish Deshmukh : "कृपया मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांचं देणं लागतो," रितेश देशमुख कोणाच्या शोधात?

Kunickaa Sadanand : 'PM केयर फंडात 9000 कोटी'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा PM मोदींना थेट सवाल, म्हणाली "bjp पक्ष भ्रष्ट नेत्यांसाठी वॅाशिंग मशिन"

2026-08-19 12:15:00

Kunickaa Sadanand : 'PM केयर फंडात 9000 कोटी'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा PM मोदींना थेट सवाल, म्हणाली "bjp पक्ष भ्रष्ट नेत्यांसाठी वॅाशिंग मशिन"

Batwara 1947 Film: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ चित्रपटाचे हेमा मालिनींकडून कौतुक

2026-08-18 12:17:20

Batwara 1947 Film: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ चित्रपटाचे हेमा मालिनींकडून कौतुक

BJP IT Cell : भाजपचे नवीन सोशल मीडिया प्रमुख दीपक म्हस्के कोण आहेत? जाणून घ्या...

2026-08-17 18:40:18

BJP IT Cell : भाजपचे नवीन सोशल मीडिया प्रमुख दीपक म्हस्के कोण आहेत? जाणून घ्या...