“तू खूप स्वप्न बघणारी आणि…”; अमृताच्या वाढदिवसानिमित्त जवळची मैत्रीण सोनालीची खास पोस्ट

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. सोशल मिडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री सोनाली खरे हिने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
सोनालीने अमृताबरोबरचे काही खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “माझ्या जवळच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अमृता तू खूप स्वप्न बघणारी आणि मनसोक्त आयुष्य जगणारी मुलगी आहेत, तू जेव्हा इतरांना माझ्याबद्दल ती माझी बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे बाकीच्यांनी तिच्यापासून लांब राहा, असं म्हणतेस ते मला खूप आवडतं.”
पुढे ती म्हणते, “आपली मैत्री खूप खरी आहे, त्यामुळेच ती इतकी वर्ष टिकून आहे. तुला यापुढेही खूप उत्तम भूमिका मिळो, तुझी प्रगती व्हावी, तुला यश मिळावं, जशी आहेस तशीच राहा आणि माझ्याबरोबर कायम राहा,” या पोस्टखाली अमृताने कमेंट करत ‘आय लव्ह यू’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
सोनालीने अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे. ती सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका असलेल्या ‘नशीबवान’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
हेही वाचा:
“एक-दोन नव्हे तर ८ युद्धे थांबवली” ; डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफवरून खळबळजनक दावा





