“तुम्ही सगळे चुकला…”; पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून शिव ठाकरे पापाराझींवर भडकला

Shiv Thakare | मराठमोळा शिव ठाकरे अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’ मराठीसह हिंदी शोमध्ये देखील तो दिसला. सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो
पापाराझींना सुनावताना दिसत आहे. अलिकेच पुनम पांडेचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यात पूनम पांडेचे उप्स मुमेंट पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले.
मात्र हा व्हिडिओ डिलिट करा असं पूनमनं पापाराझीला सांगितलं होतं, तरी देखील पापाराझीनं हा व्हिडिओ डिलिट न करता शेअर केला. या व्हिडिओवरून पूनम पांडेला ट्रोल करण्यात आलं, तर पापाराझीवरही टीका होतेय. दिव्या अग्रवालाच्या बर्थडे पार्टीतला पूनमचा हा व्हिडीओ होता. या सगळ्या प्रकरावर शिव ठाकरे यानं प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
शिव ठाकरे म्हणाला की, “या सगळ्यात तुम्ही सगळे चुकलात. तुम्हाला माहिती होतं या व्हिडिओत काही तरी चुकीचं आहे, तरी देखील तुम्ही तो व्हिडिओ शेअर केला, माहिती आहे की पूनम पांडे बोल्ड आहे, पण ती एक मुलगी आहे. व्हिडिओत नको ती गोष्टी दिसत होती हे तुम्हाला माहिती होतं, पण तुम्ही व्ह्यूजसाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाच, हे चुकीचं आहे,” असे शिव ठाकरेनं म्हटलं. Shiv Thakare |
View this post on Instagram
दरम्यान, पूनम पांडेने देखील व्हिडीओ पब्लिश नका करू असं सांगूनही केल्याने नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता शिव ठाकरेने देखील पापाराझींना सुनावले आहे.
हेही वाचा:





